India Corona Update : 24 तासांत 1.59 लाख नवे कोरोना रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्णसंख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज – भारतात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 59 हजार 632 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 10.21 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ॲक्टिव्ह रुग्ण संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 55 लाख 28 हजार 004 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 44 लाख 53 हजार 603 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 40 हजार 863 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96.27 टक्के एवढा झाला आहे.

सध्या देशात 5 लाख 90 हजार 611 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 327 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 4 लाख 83 हजार 790 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.36 टक्के एवढा झाला आहे. ‘आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 69 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम अंतर्गत आजवर 151.58 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 

ओमायक्रॉन अपडेट

देशातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 623 एवढी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात 1,009, दिल्ली 513, कर्नाटक 441, राजस्थान 373 आणि केरळ 333 रुग्ण आहेत. त्यापैकी 1,409 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.