Chikhali News: चिखलीत गोदामाला भीषण आग

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामातील सर्व साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री घडली आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरातील एका गोदामाला शनिवारी रात्री अचानक आग लागली. गोदामातील आगीने काही वेळेतच रौद्र रूप धारण केले. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळाली असता पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. भंगार साहित्य, कपडे व प्लास्टिक साहित्य जळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.