Corona Update: सीबीआयच्या मुंबई कार्यलयात कोरोनाचा कहर, तब्ब्ल 68 कर्मचारी  पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज: महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोना विषाणूचा  कहर सुरूच आहे. सीबीआयच्या मुंबई कार्यालयात शनिवारी कोरोनाचा स्फोट झाला. एकूण 68 कार्यालयीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सीबीआयचे कार्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे.

कार्यालयात काम करणाऱ्या 235 लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. 235 पैकी 68 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह  आला आहे. कोरोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

याआधी शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान 93 कर्मचाऱ्यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणांमुळे, मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांची संख्या9657 वर पोहोचली आहे, ज्यामध्ये 125 जवानांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.