-MPC-TOP-MOST-BANNER-I

India Corona Update: देशातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 51 टक्क्यांवर

India Corona Update: 11,502 new patients in last 24 hours; Total number 332,424; The cure rate is 51 percent

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- मागील 24 तासांत देशात 11,502 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली गेली. तर 325 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,69,798 इतकी आहे. तर देशात आतापर्यंत 9,520 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 332,424 वर पोहोचली आहे. देशात कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर 51.07 टक्क्यांवर पोहोचला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1,07,798 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे पैकी 53,030 सक्रिय रुग्ण आहेत तर 50,978 रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात आजवर 3950 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तमिळनाडू मध्ये 44,661 एकूण रूग्णांची संख्या आहे तर दिल्लीमध्ये आजवर 41,182 रूग्णांची नोंद झाली आहे.

देशात कोरोनाचा हाहाकार वाढतच चालला आहे. अशात आता अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत हा तिसरा देश आहे जिथे दररोज दहा हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंग यांनी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन दिल्लीतील वाढत्या कोरोना रूग्णाच्या परिस्थितीचा आढावा घेतला व येत्या दोन दिवसात दिल्लीतील कोरोना चाचणीचा वेग तीन पटीने वाढवण्याची सूचना देखील करण्यात आली.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn