India Corona Update: 24 तासांत 60 हजार 975 नवे रुग्ण 848 रुग्णांचा मृत्यू

India Corona Update: 60975 new patients 848 patients died in 24 hours देशात आजवर तब्बल 58 हजार 390 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – मागील 24 तासांत देशभरात 60 हजार 975 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून 848 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासह देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 31.67 लाखांवर गेली आहे.

देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 31 लाख 67 हजार 324 एवढी झाली आहे. त्यापैकी सध्या 7 लाख 04 हजार 348 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्ण संख्येपैकी आजवर 24 लाख 04 हजार 585 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात मागील 24 तासांत 848 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आजवर तब्बल 58 हजार 390 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 3 कोटी 68 लाख 27 हजार 520 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 9 लाख 25 हजार 383 नमुने हे सोमवारी (दि.24) तपासण्यात आले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 66 हजार 550 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते सध्या 75.27 टक्के एवढे झाले आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील कमी झाले असून देशाचा मृत्युदर 1.87 टक्के एवढा आहे.

देशात करोना चाचणीची संख्या वाढल्यामुळे रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या आधिक वाढत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.