India Corona Update: भारतात एका दिवसांत सर्वाधिक 83,883 नवे रुग्ण

India Corona Update: India has the highest number of 83,883 new patients in a single day मागील 24 तासांत 1043 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा हा 67,376 झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77.09 टक्के झाला आहे.

एमपीसी न्यूज- भारतात कोविड-19चे एका दिवसांत सर्वाधिक 83,883 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे भारतातील बाधितांची संख्या 38 लाखांवर गेली आहे. आतापर्यंत 29,70,492 रुग्ण बरे झाले असून हा दर 77 टक्क्यांच्यावर गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात कोविड-19 चे रुग्ण वाढून 38,53,406 इतके झाले आहे.

मागील 24 तासांत 1043 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा हा 67,376 झाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर हा 77.09 टक्के झाला आहे. मृत्यू दरात घट होऊन तो 1.75 टक्के इतका झाला आहे.


आकडेवारीनुसार देशात आता 8,15,538 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्याचे प्रमाण 21.16 टक्के आहे. देशात 7 ऑगस्ट रोजी कोविड-19 चे रुग्ण 20 लाखांच्या वर गेले होते. तर 23 ऑगस्ट रोजी हा आकडा 30 लाखांच्या वर गेला होता.


आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबरपर्यंत एकूण 4,55,09,380 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील 11,72,179 नुमने हे केवळ बुधवारी तपासण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.