Pune Crime News : पोलिसांची खबरी असल्याच्या संशयावरुन ‘इराणी’ महिलेला जमावाकडून बेदम मारहाण

चौघांना अटक

एमपीसी न्यूज : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीला पंधरा ते वीस जणांच्या जमावाने बेदम मारहाण केली. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा गांधी वसाहतीत हा प्रकार घडला. याप्रकरणी महिला आणि पुरुषांसह वीस ते बावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकीना फिरोज इराणी, कझम हुमायु ईरानी, अवलाद हुमायु इराणी, अली फिरोज इराणी, अब्बास फिरोज इराणी, अबुझर फिरोज इराणी, फातिमा कझन इराणी यांच्यासह 20 ते 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन कंबर इराणी (वय 37) त्यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. यातील चार जणांना खडकी पोलिसांनी अटकही केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे शिवाजीनगर येथील त्यांच्या महात्मा गांधी वसाहतीतील घरासमोर कुटुंबासह बसले होते. याच वेळी आरोपी सकीना फिरोज इराणी आणि फाथीमा कजन इराणी त्या ठिकाणी आल्या. त्यांनी फिर्यादिला तू पोलिसांची खबरी आहेस, तू आमच्या बाबत खोटी माहिती पोलिसांना गुपचुप देत असते, असा आरोप करत इतर आरोपींनी एकत्र येऊन दोघांच्या घरावर दगडफेक करत फिर्यादीला हाताने मारहाण करून शिवीगाळ केली.

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील चार आरोपींना अटकही केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.