Kalewadi Phata: काळेवाडी फाटा येथून तरुणाला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा येथून  पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला (Kalewadi Phata)कोयत्यासह अटक केली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने  बुधवारी (दि.10) केली आहे.

प्रितम नंदू अवतारे (वय 26 रा.पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी (Kalewadi Phata)पोलीस हवालदार आशिष बोटके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोणत्याही  परवान्या शिवाय परिसरात हत्यार बंदी असताना देखील  त्याच्या ताब्यात घेवून फिर्त होता. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा कोयता जप्त केला आहे. यावरून वाकड पोलिसांनी आरोपीवर गुन्ह दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.