Pune News : कमला नेहरू रुग्णालयाचा होणार कायापालट

एमपीसी न्यूज : प्रस्तावित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय आवारात उभारण्यात येणार आहे. मात्र, या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी काही कालावधी जाणार आहे. त्यामुळे मंगळवार पेठेतील सणस शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये हे महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्यामुळे हे महाविद्यालयास कमला नेहरू रुग्णालयास संलग्न केले जाणार आहे. येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांची उभारणी केली जाणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

वैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज 300 खाटांचे रुग्णालय आवश्‍यक आहे. तर कमला नेहरू रुग्णालयात सुमारे 400 खाटांची सुविधा आहे. हे रुग्णालय सध्या प्रसूती आणि संबंधित उपचारांसाठी वापरले जात आहे.

येथे सध्या सहा ते सात ओपीडी सुरू आहेत. मात्र, वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता सुमारे 16 ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत. याशिवाय आयसीयू, सुसज्ज रक्तपेढी, वॉर्ड उभारले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.