Kasarwadi : कासारवाडी रेल्वेस्थानकावर आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – कासारवाडी रेल्वे स्थानकावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (दि. 1) सकाळी उघडकीस आली.

पिंपरी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणाचे वय अंदाजे 40 वर्ष असून वर्ण सावळा आहे. त्याच्या डाव्या हातावर बदाम गोंदलेला असून त्यामध्ये ‘एम’ हे अक्षर आहे. तसेच दुसऱ्या हातावरील बदामात ‘एमटी’ असे अक्षर गोंदलेले आहे. तरुणाने अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व सफेद रंगाचा काळ्या फुल्या असलेला शर्ट परिधान केला आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो कासारवाडी रेल्वे स्टेशनवर मृतावस्थेत मिळून आला. या व्यक्‍तीाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.