Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – छोटया पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात तिने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती.

आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्या प्रकरणी केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कऴवा पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. केतकीच्या विरोधात कऴवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्नील नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Pune News : ‘ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक’, अभिनेत्री केतकी चितळेची वादग्रस्त पोस्ट

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी पुण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Thombre) यांनी देखील पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी केतकी चितळेच्या पोस्टबद्दल संताप व्यक्त करत, आपण तिला चोप देणार असल्याचं सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी अभिनेत्री केतकी चितळे हिने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली. शरद पवारांविषयी अतिशय गलिच्छ आणि खालच्या भाषेत या पोस्टमध्ये टिपणी करण्यात आली. दुसऱ्याच एका व्यक्तीची ही पोस्ट केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे.

दरम्यान केतकी चितळे हिने केलेल्या फेसबुक पोस्टवरून संपूर्ण राज्यात गदारोळ उडाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तिच्याविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात देखील तक्रार दिली असून केतकी चितळेला अटक करण्याची मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.