Ketki chitale : नुकसान भरापाईच्या मागणीसाठी केतकी चितळे उच्च न्यायालयात

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki chitale)   पोलीसांनी अटक केली होती. पवारांवर टीका केल्याने केतकीच्या त्या पोस्टनंतर राज्यभर तिच्याविरोधात आंदोलने झाली होती. तिच्यावर कडक कारवाई करावी यासाठी विविध पोलीस ठाण्यात तिच्याविरुध्द गुन्हे दाखल केले होते.

 

या सगळ्या तक्रारींची नोंद घेऊन एकत्रितपणे त्या गुन्ह्यांचा तपास पोलीसांनी सुरु केला. आता केतकी चितळेनं आपल्याला करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 

Vallabhnagar Depot : राज्य परिवहन महामंडळाचे पास नुतनीकरण केंद्र वल्लभनगर आगारात सुरु करण्याची मागणी

 

केतकीने (Ketki chitale) यापूर्वी देखील उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती.आता एएनआयने केलेल्या व्टिटमध्ये तिनं पुन्हा उच्च न्यायालयामध्ये नव्यान सुटकेसाठी अर्ज केला आहे. त्यामध्ये पोलीसांनी केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे तिने म्हंटले आहे. केतकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवरून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. केतकी ही तिच्या वादग्रस्त पोस्टसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.ती अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियामुळेच जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे.

SSC Result : दहावीचा ऑनलाईन निकाल लागणार शुक्रवारी

 

पहिल्यांदा जेव्हा तिला न्यायालयासमोर हजर केले त्यात तिनं आपण जे काही केले ते आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे म्हटले होते.त्यावरुन देखील तिच्यावर टीका करण्यात आली होती.केतकीने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता.त्यानंतर आता तिनं पुन्हा उच्च न्यायालयात मला जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे.याशिवाय व्यक्तिस्वातंत्र्याचा भंग केल्याबद्दल नुकसान भरापई मिळावी अशी विनंती तिने कोर्टाला केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.