Khopoli : मोरबे धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

एमपीसी न्यूज : धरण परिसरातील (Khopoli) अपघात ध्यानात घेता, यंदा रायगड जिल्हा प्रशासनाने धरण परिसरात जमावबंदी आदेश लागू केलेले असताना देखील रविवारी खालापूर तालुक्यातील मोरबे धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. आज सकाळी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.

Bhosri Crime : कोयता दाखवत तरुणाला केली मारहाण; जीवे मारण्याची धमकी

वैभव रामनाथ गवांदे (रा. मुंबई) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. तो बुडाल्याची माहिती समजल्यानंतर आज सकाळी पोलीस व स्थानिकांसह खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते धरणावर गेले होते. अभिजित घरत, अमित गुजरे, अमोल कदम, हनिफ कर्जीकर, भक्ती साठेलकर, मेहबूब जमादार, धनंजय गीध, जयंत तांबे हे खोपोली येथून सर्च (Khopoli) ऑपरेशनसाठी पोहचले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस नाईक वसकोटी, पानसरे यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी नऊ वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.