Kidney Smuggling Case : रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित

एमपीसी न्यूज : एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून ती एका रुग्णाची पत्नी असल्याचं दर्शवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली होती.

या संपूर्ण प्रकरणाची राज्याच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेत रूबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस पाठवून अवयव प्रत्यारोपण परवाना का रद्द करू नये अशी विचारणा केली होती. त्यावर 24 तासात उत्तर देण्याचे आदेशात म्हटले होते. त्यानुसार रुपी हॉल क्लिकने उत्तरही दिले. यानंतर रूबी हॉल क्लिनिकचा अवयव प्रत्यारोपण परवाना किडनी तस्करी प्रकरणाचा अंतिम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याने हे आदेश काढले आहेत.

या प्रकरणावर राज्यसरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सदस्यांची चौकशी समितीही नेमली आहे. या चौकशी समितीचे कामकाज सुरू असून संस्कृतमधील अवयव प्रत्यारोपण पडताळणी समितीतील सदस्यांची ही त्यांनी चौकशी केली आहे. त्यांचा अहवाल येणे बाकी आहे. तोपर्यंत रुबी हॉल क्लिनिकची अवयव प्रत्यारोपणाची परवानगी काढून घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले  आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.