Pune News : पुण्यात सीएनजीच्या दरात पाच रुपयांनी वाढ, महागाईने होरपळलेल्या पुणेकरांना आणखी एक दणका

एमपीसी न्यूज : महागाईने होरपळलेल्या जनतेला आणखी एक धक्का बसला आहे. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडलेले असतानाच पुण्यात आजपासून सीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलोमागे पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

सीएनजी चे दर 68 रुपये प्रति किलो वरून  73 रुपये प्रति किलो वर पोहोचले आहेत. आज पासून पुण्यात हे नवीन दर लागू असतील. काही दिवसांपूर्वीच शहरात सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पासून ही दरवाढ पुन्हा एकदा लागू होईल.

या दरवाढी मागे प्रमुख कारण म्हणजे सीएनजी गॅस च्या मिश्रणात एका विशिष्ट आयातीत वायूची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात त्या गॅसची किंमत दुप्पट झाल्याने सीएनजीचे भाव वाढवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या दरात आधीच भरमसाठ वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक आधीच त्रस्त आहेत. त्यात आता सीएनजी गॅस च्या किमती देखील वाढल्याने त्याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.

दरम्यान एकीकडे आजपासून सीएनजीच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. मात्र दुसरीकडे दिलासादायक बातमी म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. मागील सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.