Pune News : इंद्रायणी नदीवरील तुळापूर येथील मोठा पूल जड वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीवरील तुळापूर येथील मोठा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल धोकादायक झाल्याने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शिक्रापूर चाकण रोडने अथवा विश्रांतवाडी आळंदी रोडने इच्छीत स्थळी जाता येईल.

पोलीस उपायुक्त, वाहतूक राहुल श्रीरामे यांनी याबाबत आज (सोमवार, दि.10) परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.

लोणीकंद वाहतूक विभाग अंतर्गत आळंदी – मरकळ, तुळापूर- फुलगाव, लोणीकंद थेऊर लोणी काळभोर, वडकी, उंड्री, कात्रज राष्ट्रीय महामार्ग 166 मौजे तुळापूर येथे इंद्रायणी नदीवरील हा मोठा पूल आहे. हा पूल धोकादायक झाल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आजपासून पुलावर जड वाहतुकीला बंदी घातली आहे. दरम्यान पुलावरुन अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.