Pune News : कात्रज परिसरात बिबट्याचे दर्शन, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरात बिबट्या आढळून आल्याचा प्रकार उघडकीस. काही नागरिकांना हा बिबट्या दिसल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस व वनविभाग येथे दाखल झाले असून, बिबट्याचा शोध घेतला जात आहे. तर नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

कात्रज परिसरातील डोंगर भागाला लागून गुजर निंबाळकर वाडी गाव आहे. या गावचा विश्वर नागरिकांना बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी तात्काळ ही माहिती वनविभाग व भारती विद्यापीठ पोलीसाना दिली. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी प्रथम येथे धाव घेतली. तसेच  वनविभागाला माहिती कळवली. त्यानंतर वनविभाग देखील येथे दाखल झाले.

अंधारात काही वेळ बिबट्याचा शोध घेतला. पण, नंतर त्याचे दर्शन झाले नाही. पण, यावेळी बिबट्याला प्रत्यक्षात पाहणाऱ्या नागरिकांनी त्याबाबत माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी नागरिकांना योग्य सूचना दिल्या. तर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काही माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान पुण्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.