रविवार, सप्टेंबर 25, 2022

Lonavala: पुण्यातील तरुणाचा वाकसई येथील ओढ्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज- वाकसई व कार्ला गावाच्या वेशीवर असलेल्या पाण्याच्या ओढ्यात बुडून एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. आज (दि.2) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अमिन अन्सर शेख (वय 23, रा. विश्रांतवाडी पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील नऊ जणांचा समूह लोणावळा परिसरात आला होता. सायंकाळच्या सुमारास ते ट्रेझर आयलँन्ड हॉटेल शेजारी असलेल्या ओढ्यात उतरले होते. पाण्यात खेळत असताना अमिन याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लोणावळा ग्रामीणचे पोलीस हवालदार अजित ननावरे, पोलीस नाईक विजय रहातेकर, पोलीस पाटील सुर्यकांत विकारी यांनी घटनास्थळावर जाऊन अमिन याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी खंडाळा येथे पाठवून दिला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news