Lonavala Accident News: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर घाटात उलटला सिमेंटचा ट्रक, चालकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोर घाटातील किमी 36 जवळ आज सकाळी 8.45 वाजण्याच्या सुमारास सिमेंटची पोती घेऊन जाणारा ट्रक (MH 46 DM 7806) सुरक्षा भिंतीवरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेटोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट महामार्ग पोलीस, लोकमान्यची टिम मृत्यूंजय, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी धाव घेत मयत चालकाला गाडीखालून बाहेर काढले. ढेकू गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.