Maharashtra Corona Update : राज्यात आज 1,338 नवे कोरोना रुग्ण, 1,584 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी) 1 हजार 338 नवे रुग्ण वाढले असून, 1 हजार 584 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वीस हजाराच्या खाली आली असून, सध्या 18 हजार 465 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत‌.

आरोग्य विभागाच्य़ा आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 09 हजार 292 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 47 हजार 068 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.55 टक्के झाला आहे.

राज्यात आज 36 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 40 हजार 170 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 6 कोटी 24 लाख 39 हजार 900 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 908 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 68 हजार 338 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.