Maharashtra Corona Update : राज्यात आज 67,160 नवे रुग्ण; 63,818 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज 67 हजार 160 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर,
63 हजार 818 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 34 लाख 68 हजार 610 रुग्ण उपचाराअंती बरे झाले असून, राज्याचा रिकव्हरी रेट 82.02 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 42 लाख 28 हजार 836 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 94 हजार 480 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 676 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 63 हजार 928 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 41 लाख 87 हजार 675 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 29 हजार 246 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 54 लाख 60 हजार 008 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.