Maharashtra Corona Update : राज्यात आज 8,293 नवे रुग्ण, एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21.55 लाख

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 62 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21.55 लाखांवर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 21 लाख 55 हजार 070 एवढी झाली आहे. त्यापैकी 20 लाख 24 हजार 704 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 3 हजार 753 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात 77 हजार 008 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात राज्यात 62 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 52 हजार 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.42 टक्के एवढा आहे तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.95 टक्के झाले आहे.

राज्यात सध्या 3 लाख 35 हजार 492 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 332 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. पुण्यात सध्या सर्वाधिक 15 हजार 005 सक्रिय रुग्ण आहेत तर, मुंबईत 8 हजार 299 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.