Maharashtra Corona Update : दिलासादायक ! राज्यातील दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त, आज 9,251 नव्या रुग्णांची नोंद

Comfortable! Two lakh patients in the state are corona free, today 9,251 new patients were registered : राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.55 टक्के एवढे झाले आहे.

एमपीसी न्यूज – राज्यात आज 7,227 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यत
2,07,194 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 56.55 टक्के एवढे झाले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,66,368 झाली आहे. यापैकी एकूण 2,07,194 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर सध्या राज्यात एकूण 1,45,481 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात आज 257 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.65 टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले 257 मृत्यू हे मुंबई मनपा-52, ठाणे-3, ठाणे मनपा-9, नवी मुंबई मनपा-9,कल्याण-डोंबिवली मनपा-12, उल्हासनगर मनपा-5, भिवंडी निजामपूर मनपा-9, मीरा-भाईंदर मनपा-2, वसई-विरार मनपा-7, पालघर-2, रायगड-3, पनवेल मनपा-3, नाशिक-4, नाशिक मनपा-8, धुळे- 1, धुळे मनपा-1, जळगाव-5, जळगाव मनपा-4, नंदूरबार-1, पुणे-17, पुणे मनपा-45, पिंपरी-चिंचवड मनपा-10, सोलापूर-8, सोलापूर मनपा-4,सातारा-1, कोल्हापूर-7, सांगली-2, सांगली मिरज कुपवाड मनपा-1, सिंधुदूर्ग-1, रत्नागिरी-5, औरंगाबाद मनपा-4, जालना-3, बीड-1, नांदेड-3, नांदेड-1, नांदेड मनपा-1, अकोला-1, अमरावती मनपा-1, बुलढाणा-1,नागपूर मनपा-1, वर्धा-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य 1 अशी आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 18,36,920 नमुन्यांपैकी 3,66,368 नमुने पॉझिटिव्ह   आले आहेत. राज्यात 8,94,509 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44,603 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या आता सर्वोच्च पातळीवर आल्याचंही सांगितलं जात आहे.

दररोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळेच देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून जेवढ्या जास्त चाचण्या होतील तेवढी संख्या वाढेल असे आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.