Pimpri Chinchwad : महाराष्ट्र वितरक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वितरकांचे  प्रश्न सोडवावेत : मारुती साळुंखे 

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील विविध  वितरकांसाठी फक्त शिवसेनेची  संघटना आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रकारचे होलसेल व्यापारी व  वितरकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्याचे काम  महाराष्ट्र वितरक सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  करावे. त्याचबरोबर वितरक सेनेचे जास्तीत जास्त सभासद करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र वितरक सेनेचे राज्य अध्यक्ष मारुती साळुंखे यांनी केले. 

आकुर्डी येथील  शिवसेना भवनात महाराष्ट्र वितरक सेना पिंपरी चिंचवड शहर  जिल्हा कार्यकारिणीचा मेळावा नुकताच उत्साहात पार पडला.  त्यावेळी  उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना  मार्गदर्शन करताना साळुंखे बोलत होते. शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व अन्य संगणीकृत संघटनांच्या  पदाधिकारी आणि शिवसैनिकांना विश्वासात घेऊन  महाराष्ट्र वितरक सेनेची मजबुज बांधणी करावी. या माध्यमातून शहरातील  सर्व  प्रकारच्या  वितरकांना न्याय मिळवून देण्याचे काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना शहरप्रमुख  योगेश बाबर,  जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,  महाराष्ट वितरक  सेनचे  पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष रावसाहेब थोरात,  सरचिटणीस वैभव छाजेड, खजिनदार महेन्द्र सिंह शेखावत, उपजिल्हा अध्यक्ष  गोविंद बालघरे, गणेश आहेर, बाळासाहेब नाखाडे आदी उपस्थित होते.

या वेळी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा अनिता सोनावणे यांनी शिवसेनेत प्रवेश करीत  महाराष्ट्र वितरक सेनेचे सदस्यत्व स्वीकारले.  शिवाय चिंचवड परिसरातील अनेक वितरकांनीही महाराष्ट्र वितरक सेनेचे सदस्यत्व स्वीकारले. महाराष्ट्र वितरक सेना  भोसरी विधानसभा कार्यकारणी या मेळाव्याचे संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.