Maharashtra News : व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 92 रुपयांची कपात पण घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल नाही

एमपीसी न्यूज-सरकारकडून आज  पहिल्याच दिवशी (Maharashtra News) व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 92 रुपयांची कपात  करण्यात आली आहे.पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 87 रुपयाने कपात होईल.मात्र घरगुती (14.2 किलोग्रामच्या ) सिलेंडरच्या दररोज कोणताही बदल झालेला नाही.त्यामुळे सामान्य जनतेच्या पदरी निराशाच पडली आहे. 

 

सरकारने मार्च महिन्यात व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात तीनशे पन्नास रुपयांची वाढ केली होती .आता दर 92 रुपये कमी केले आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस 2018 नंतर कोलकत्ता 2132 रुपयांमध्ये विकला जात आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी गॅस 1980 रुपये आणि चेन्नई 2192.50 रुपये इतके झाले आहेत .

 

 

MPC News Podcast 01 April 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

 

घरगुती गॅसच्या किंमती गेल्या महिन्यापासून जै से थे आहेत .घरगुती गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांची समीक्षा करतात.  सर्व सामान्यांचे लक्ष हे घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये कधी कपात होते याकडे लागले आहे; मात्र आजही घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये कपात न करता व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 92 रुपयांची तुटपुंजी कपात करुन (Maharashtra News) सामान्य जनतेचा एक प्रकारे एप्रिल फूलच केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.