Maharashtra Political crises : पक्षचिन्हाबाबत आता निवडणूक आयोग निर्णय घेणार, शिंदे गटाला दिलासा

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी पार पडली आहे. (Maharashtra Political crises) पक्षचिन्हावर आता आयोग निर्णय घेणार असल्याचं सुप्रिम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांची अपात्रता, शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे याप्रकरणी सुनावणी पार पडली.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने भारतीय निवडणूक आयोगाला एकनाथ शिंदे गटाचा खरा शिवसेना असल्याचा दावा करण्यापासून रोखण्यास नकार दिला. दिवसभराच्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेला स्थगितीचा अर्ज फेटाळल सर्वोच्च न्यायलायने फेटाळला आहे.

सुप्रीम कोर्टात सकाळपासून सुरु असलेल्या सुनावणीनंतर घटनापीठानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिंदे गटाला कोर्टाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोग पक्ष चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. याबाबत कोणतीही स्थगिती न देण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग घेणार आहे. शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. खरी शिवसेना कोणती याचा निर्णय आता निवडणूक आयोगाकडे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे.

निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला आपली कागदपत्रं जमा करण्याचे निर्देश दिले होते. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात असल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.