Maharshi Karve: महर्षी कर्वे युगप्रवर्तक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

एमपीसी न्यूज – महर्षी कर्वे (Maharshi Karve) हे युगप्रवर्तक होते, त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह ह्या क्षेत्रात त्या काळात केलेले कार्य अतुलनीय असल्यानेच त्यांना महर्षी ही उपाधी दिली गेली, अश्या अवतारी पुरुषाच्या नावाने कार्यरत संस्थेस भेट देताना मला मंदिरात आल्याचा आनंद होत आहे असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले. 

कर्वे समाज सेवा संस्थेस भेट दिल्यानंतर तेथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्यासह व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक कराळे,सचिव एम.शिवकुमार,कोषाध्यक्ष दीपक जानोरीकर, सदस्य जगदीश पाटील, रवि पवार,वैजनाथ बिरादार, संचालक श्रीमती शर्मिला रामटेके इ उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले ” समाजात देणारे खूप जण आहेत, विशेषतः महाराष्ट्रात तर खूप दानशूर व्यक्ती आहेत, कमतरता आहे ती मागणाऱ्यांची ” त्यामुळे आपण समाजोपयोगी उपक्रम घेऊन लोकांकडे जायला हवे असेही ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात निम्न स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे (Maharshi Karve) आणि त्यासाठी संस्थेने कार्यविस्तार करावा यासाठी लागणारी सर्व आवश्यक मदत कुलपती म्हणून करेन. नवीन शैक्षणिक धोरणात पहिल्यांदाच संस्कारांना ही महत्व असल्याने त्यावरही लक्ष केंद्रित करावे. हे सर्व एक मिशन म्हणून स्वीकारा, तुमचे सर्वस्व द्या आणि बघा. त्याग आणि तपस्या यामुळे सगळे साध्य होते, असेही ते म्हणाले.

Talegaon Dabhade : श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती महोत्सवास सुरुवात

तत्पूर्वी प्रास्ताविक करताना (Maharshi Karve) संस्थेचे विश्वस्त संदीप खर्डेकर यांनी संस्थेची माहिती देताना सांगितले की 1963 मध्ये महर्षी कर्वे यांचे सुपुत्र भास्कर कर्वे यांनी ह्या संस्थेची स्थापना केली व त्यांनी ह्याचा पाया रचला. संस्था सध्या एम एस डब्लू, पी एच डी, एम फिल, पदव्युत्तर सी एस आर मध्ये डिप्लोमा आणि मानसिक आरोग्य मध्ये  देखील डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत.मात्र आम्हाला संस्थेचा विस्तार करावयाचा असून त्यासाठी आपण पालक म्हणून आमच्या पाठीशी उभे राहावे. संस्थेने विविध कारपोरेट कंपन्यासोबत केलेल्या सी एस आर उपक्रमांची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष मधुकर पाठक यांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू भेट देऊन राज्यपाल महोदयांचा सत्कार केला, तसेच संस्थेच्या आवारात फुलविलेल्या बागेतील फुलांचा गुच्छ त्यांना भेट दिला. ह्या सर्व वस्तू संस्थेच्या सी एस आर उपक्रमांतर्गत तयार केल्याची माहिती पाठक यांनी दिली. यावेळी संस्थेचे संचालक (सी.एस आर) महेश ठाकूर, प्रा.चेतन दिवाण व रजिस्ट्रार प्रसाद कोल्हटकर यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तर संस्थेचे विद्यार्थी अमित इंगळे व मुक्ता ढवळे यांना त्यांच्या नशामुक्ती अभियान मधील कार्यासाठी सन्मानित करण्यात आले.

तसेच आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून प्रा. चित्रा राजूस्कर यांच्या दिव्यांग मुले व पालकांच्या समस्या या विषयावरील विशेष ऋतुरंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

मधुकर पाठक यांनी स्वागत, संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक, विनायक कराळे यांनी आभार प्रदर्शन तर श्रेष्ठा बेपारी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.