Mahashivratri 2022 : मावळमध्ये महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- कोरोना साथीचे संकट कमी झाल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत महाशिवरात्रीचा उत्सव मावळ मध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. भाविकांनी सुद्धा मोठ्या संख्येने हजेरी लावून महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा करत असल्याचे दिसूव येत आहे. 

मावळमध्ये रायवूड लोणावळा, संगमेश्वर वडिवळे, घोरावडेश्वर घोरावाडी या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक येत असतात, मात्र कोरोना साथीच्या फैलावामुळे सरकारीनिर्बंध असल्याने गेली दोन वर्षे महाशिवरात्रीचा उत्सव होऊ शकला नाही. मात्र या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा यात्रेच्या निमित्त बाजारपेठा फुलताना दिसल्या.

लॉकडाऊन मध्ये उत्सवांवर अवलंबून असलेल्या दुकानदारांचे, व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  परंतु ह्या वर्षी त्यांच्या चेहऱ्यावर नवे चैतन्य पाहायला मिळाले.

वाडिवळे येथील संगमेश्वर मंदिर हे प्रामुख्याने मावळातील भाविकांचे श्रद्धास्थान असून ह्यावर्षी भाविकांची प्रचंड गर्दी लोटलेली पाहायला मिळाली. दरम्यान, वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कामशेत पोलिसांकडून योग्यरीत्या नियोजन करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.