Mahavitaran : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

पुणे परिमंडलात 102 कोटींची थकबाकी; मार्चमध्ये 22 हजारांवर वीजजोडण्या खंडित

एमपीसी न्यूज  : पुणे परिमंडलातील 5 लाख 11 हजार 614 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 102 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी (Mahavitaran) त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तर वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने मार्च महिन्यात आतापर्यंत 22 हजार 816 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी (दि.30) सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. (Mahavitaran) त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. मुख्य अभियंता राजेंद्र पवार परिमंडलात दौरे करून थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत.

Pune : पुण्यात 3100 कोटींचे रस्ते; पालिकेचा आराखडा तयार

पुणे शहरात एकूण 2 लाख 15 हजार 454 वीजग्राहकांकडे 33 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 88 हजार 295 ग्राहकांकडे 24 कोटी 87 लाख रुपये, वाणिज्यिक 25 हजार 468 ग्राहकांकडे 7 कोटी 52 लाख रुपये, औद्योगिक 1 हजार 691 ग्राहकांकडे 94 लाख 64 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 27 दिवसांमध्ये पुणे शहरातील 16 हजार 80 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 1 लाख 4 हजार 770 वीजग्राहकांकडे 24 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 89 हजार 276 ग्राहकांकडे 13 कोटी 98 लाख रुपये, वाणिज्यिक 12 हजार 384 ग्राहकांकडे 5 कोटी 67 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 110 ग्राहकांकडे 4 कोटी 86 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 27 दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवडमधील 3 हजार 616 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण 1 लाख 91 हजार 390 वीजग्राहकांकडे 44 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 72 हजार 952 ग्राहकांकडे 31 कोटी 48 लाख रुपये, वाणिज्यिक 15 हजार 894 ग्राहकांकडे 8 कोटी 14 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 544 ग्राहकांकडे 4 कोटी 76 लाख रुपयांची थकबाकी आहे. (Mahavitaran) तर या महिन्यांत आतापर्यंत 3 हजार 120 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.