Chinchwad Crime News : कानातील फुले विकण्यावरून झालेल्या वादातून पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज – कानातील सोन्याची फुले परस्पर विकल्याच्या कारणावरून पती-पत्नीचा वाद झाला. त्यातून पतीने पत्नीवर चाकूने वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) पहाटे पाच वाजता नागसेन नगर झोपडपट्टी, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली.

गुंडांम्मा मलकेश कांबळे (वय 32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन रेवणसिद्ध बनसोडे (रा. नागसेननगर झोपडपट्टी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन हा फिर्यादी कांबळे यांच्या बहिणीचा पती आहे. नितीन आणि त्याच्या पत्नीचे दोन दिवसांपूर्वी कानातील सोन्याची फुले परस्पर विकण्यावरून भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणावरून सोमवारी पहाटे नितीन याने त्याची पत्नी झोपली असताना पत्नीच्या खांद्यावर, गळ्याजवळ, मानेवर वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी नितीन निघून गेला. याप्रकरणी चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.