Man Ki Baat: पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ला ‘लाइक’ पेक्षा ‘डिसलाइक’च जास्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीसह 'पीएमओ', 'पीआयबी', 'नरेंद्र मोदी' आणि 'भारतीय जनता पार्टी'च्या युट्यूब चॅनलवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाला नागरिकांनी नापसंत केल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. मात्र, पहिल्यांदाच या मन की बात कार्यक्रमाला लोकांनी मोठ्या प्रमाणावर डिसलाइक केल्याचे दिसून आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण आकाशवाणीसह ‘पीएमओ’, ‘पीआयबी’, ‘नरेंद्र मोदी’ आणि ‘भारतीय जनता पार्टी’च्या युट्यूब चॅनलवर देखील या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाते. मात्र पहिल्यांदाच या कार्यक्रमाला लाइकपेक्षा डिसलाइकच जास्त भेटल्या आहेत.

‘पीएमओ’ या युट्यूब चॅनलवर मन की बात कार्यक्रमाला 7 लाखपेक्षा जास्त व्हिव्ह्यूज मिळाल्या असून त्याला 26 हजार लाइक तर 45 हजार डिसलाइक मिळाल्या आहेत.

‘पीआयबी’ वर या कार्यक्रमाला 99 हजार लोकांनी पाहिले त्यात या चॅनलवर त्यांना 3.6 हजार लाइक तर 9.4 डिसलाइक मिळाल्या आहेत.

‘नरेंद्र मोदी’ या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम 1 लाख 16 लोकांनी पाहिला त्यापैकी त्यांना 5.9 हजार लाइक तर 10 हजार डिसलाइक मिळाल्या आहेत.

‘भारतीय जनता पार्टी’च्या युट्यूब चॅनलवर या कार्यक्रमाला सर्वाधिक डिसलाइक मिळाल्या आहेत. या चॅनलवर तब्बल दहा लाखपेक्षा जास्त लोकांनी हा कार्यक्रम पाहिला असून त्यापैकी 36 हजार लोकांनी लाइक केलं तर 3 लाख 5 हजार लोकांनी डिसलाइक केलं आहे.

पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला लाइक पेक्षा डिसलाइक जास्त मिळाल्या असून यामागे नेमके काय कारण आहे याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात काय म्हणाले ?

खेळणी निर्मिती, उत्पादनामध्ये भारत एक मोठे केंद्र कसे बनू शकते, याच्याविषयी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळणी निर्मिती क्षेत्रातल्या उद्योजकांनी एकत्र यावे आणि स्थानिक खेळणी बनविणा-यांना वाव द्यावा, त्यांच्या खेळण्यांचा प्रसार करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ‘व्होकल फॉर लोकल’ व्हावे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

पंतप्रधानांनी सप्टेबर महिना पोषण माह- पोषक आहाराचा महिना म्हणून पाळणार असल्याचे जाहीर केले. पोषण आणि राष्ट्र यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी सोफी आणि विदा या भारतीय लष्करातील ‘चीफ ऑफ आर्मी स्टाफ कंमेंडेशन कार्डस’ या पुरस्काराने सन्मानित श्वानांचा उल्लेख केला. ते म्हणाले, जर तुम्ही कुत्रा पाळण्याचा विचार करणार असाल, तर स्थानिक प्रजातीच्या श्वानाला आपल्या घरी घेऊन या असे आवाहन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.