India Corona Update: देशात मागील 24 तासांत 78,512 नवे रुग्ण, 971 जणांचा मृत्यू

India Corona Update: 78,512 new cases, 971 deaths in the last 24 hours in the country दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी जवळपास 27 लाख 74 हजार 802 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 78 हजार 512 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 971 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाखांच्या पुढे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 36 लाख 21 हजार 246 एवढी झाली आहे. देशात सध्या. 7 लाख 81 हजार 975 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे एकूण बाधित रुग्णांपैकी जवळपास 27 लाख 74 हजार 802 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. मागील 24 तासांत देशभरात 971 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशात आजवर 64 हजार 469 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात आजवर 4 कोटी 23 लाख 07 हजार 914 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 8 लाख 46 हजार 278 चाचण्या या रविवारी (दि.30) करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 60 हजार 868 कोरोनामुक्त रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट 76.61 टक्के एवढा झाला आहे. देशातील मृत्यू दर 1.79 टक्के आहे. देशात सध्या 21.60 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.