Manobodh by Priya Shende Part 32 : अहिल्या शिळा राघवे मुक्त केली

एमपीसी न्यूज – मनोबोध  : मनाचे श्लोक क्रमांक 32 – Manobodh by Priya Shende Part 32 : 

अहिल्या शिळा राघवे मुक्त केली

पदी लागता दिव्य होऊनि गेली

जया वर्णिता शीणली वेदवाणी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

ह्या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 32) पण समर्थांनी रामायणातील प्रसंग सांगितला आहे. अहिल्या ची कथा सगळ्यांना माहीतच असेल की, अहिल्या ही सौंदर्यवती होती. कोणीही सहज मोहित होईल असं तिचं सौंदर्य होतं. साक्षात इंद्रदेव तिच्या सौंदर्याने मोहित झाले आणि त्यांनी गौतम ऋषींचा रूप धारण केलं, जे की अहिल्याचे पती होते. आणि त्यांनी अहिल्येच्या घरात प्रवेश केला.

काही अनर्थ घडायच्या आत, अहिल्येला शंका आली आणि इंद्रदेव खजील होऊन तिथून निघून गेले. पण तरीही गौतम ऋषींना अहिल्येच्या चारित्र्याची शंका आली आणि संतापातच त्या पतिव्रता अहिल्येला शाप दिला की, तू शिळा होऊन पडशील म्हणजेच दगड होशील. पण जेव्हा त्यांना खरी घटना कळते, त्यावेळी ते तिला उःशाप देतात की, श्री राम प्रभू यांच्या पदस्पर्शाने तू शापमुक्त होशील.

श्रीराम, लक्ष्मण, विश्वामित्रं ऋषी जेव्हा त्या अरण्यातून जात असतात, तेव्हा श्री रामप्रभूंच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार होतो. “अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊनि गेली.” असा हा भगवंत ज्याच्या नुसत्या चरणस्पर्शाने देखील शिळेमधून अहिल्या मुक्त होते तर, आपणही अशी भक्ती केली तर तो भगवंत आपला ही उद्धार करेल, असा विश्वास या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 32) ते देत आहेत.

Todays Horoscope 11 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

अशा या भगवंताचे वर्णन करायला वेदही अपुरे पडले आहेत. तेसुद्धा शिणले, म्हणजे वेद सुद्धा त्याचं वर्णन करू शकले नाहीत. अशी ईश्वराची भक्ती आपण जर केली, अगदी मनोभावे, तर तो आपला ही उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास पुन्हा पुन्हा समर्थ देत आहेत.

त्यामुळे प्रत्येकाने अनन्यभावाने त्या परमेश्वराची भक्ती करावी. म्हणजे भगवंत पण सतत आपल्या सोबतच असेल. जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.