Manobodh by Priya Shende Part 36 : सदा सर्वदा देव सन्नीध आहे

Manobodh by Priya Shende Part 36

एमपीसी न्यूज : – Manobodh by Priya Shende Part 36 – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 36.

सदा सर्वदा देव सन्नीध आहे

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे

सुखानंद आनंद कैवल्य दानी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

समर्थांचा हा श्लोक अतिशय सोपा सरळ अर्थाचा आहे (Manobodh by Priya Shende Part 36).  पहिल्या चरणात ते म्हणताहेत की, “सदासर्वदा देव सन्नीध आहे”. सन्नीध म्हणजे जवळ. म्हणजे ते म्हणताहेत की देव हा सदैव आपल्या जवळच आहे. सदासर्वदा म्हणजे कायमच आपल्या जवळ आहे.

हा परमेश्वर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी चराचरात भरलेला आहे. आपल्या हृदयात वसलेला आहे. पशुपक्षी सगळीकडे तो चैतन्य रूपाने भरलेला आहे. तो निर्गुण निराकार आहे जिथे जिथे जसा आपण पाहू तसा तो आहे. त्याला बघायला ऐकायला आपली इंद्रिये तयार हवीत.

आपला दृढ विश्वास हवा. तशी मनाची खात्री हवी. तुज आहे तुजपाशी, ह्याप्रमाणे आपला आपल्या मधला, इतरांमधला देव शोधायला यायला पाहिजे आणि त्याची ओळखही पटली पाहिजे.

Pune News : शहाळे महोत्सवात 5 हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

पुढे ते म्हणताहेत की,”कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे”, म्हणजे तो परमेश्वर आपल्या जवळच आहे, तो आपल्या संकट काळात मदतीला पण धावून येतो. त्याची लीला अगाध आहे. तो जेवढा कृपाळू आहे, तेवढाच तुमची सत्वपरीक्षा पण बघणार आहे. त्याला धाडसीपणा आवडतो. तो कौतुकाने आणि कृपाळूपणे तुम्हाला बघत असतो.

लहान असताना नाही का, वडील आपल्या छोट्या मुलाला सायकल शिकवताना सीट मागे हात लावून त्याला हळूहळू पेडल मारायला शिकवतात आणि हळूच त्याला एकटं सोडून देतात की, तो एकटा स्वतंत्रपणे सायकल चालवेल. मग तो धडपडत एकटा जेव्हा सायकल चालवायला शिकतो, तेव्हा मुलासोबतच त्या वडिलांनाना परमानंद होतो. बाकीचे पण त्या कौतुकात सहभागी होतात. अगदी तसाच परमेश्वर देखील धाडसासाठी उद्युक्त करतो आणि मदत करतो आणि त्या भक्ताचा अभिमान देखील बाळगतो.

Todays Horoscope 16 May 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

आपल्या संसारातल्या अडचणी आपण सोडवत असतो आणि मग जेव्हा आपण हतबल होतो तेव्हा, आपण देवापाशी जाऊन त्याला सांगतो की, आता फक्त तूच आहेस मला यातून सोडवणारा. तेव्हा देव आपल्याला नक्कीच मदत करतो.

पुढे समर्थ म्हणताहेत (Manobodh by Priya Shende Part 36) की, “सुखानंद आनंद कैवल्यदानी”. तो परमेश्वर कसा आहे तर, तो स्वतःच सुख आणि आनंदाने भरलेला आहे. आनंद कैवल्याचा दाता आहे. भक्तांवर कोणताही संकट आलं तर तो धावून त्याला मदत करतो आणि संकटातून सोडवतो. अशी खूप उदाहरणे आपल्याला माहीतच आहेत.

म्हणून परत एकदा समर्थ सांगताहेत की,”नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. असा कृपाळू भगवंत भक्ताची उपेक्षा कधीही करत नाही. जसं भक्ताला आपल्या देवाचा अभिमान असतो, तसाच देवाला सुद्धा आपल्या भक्ताचा अभिमान असतो. त्यासाठी तो भक्तांची सुख-दुःख अभिमानाने स्वतःकडे घेतो.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share