Maruti Baba Kurekar : शांतीब्रह्म हभप मारुती बाबा कुरेकर यांचा 92 वा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात

एमपीसी न्यूज – शांतीब्रह्म गुरुवर्य समन्वयमहर्षी हभप मारुती बाबा कुरेकर (Maruti Baba Kurekar) यांचा 92 वा अभिष्टचिंतन सोहळा काल (गुरुवारी) सकाळी आळंदी येथील रसिकलाल धारीवाल सभागृहात (फ्रुटवाले धर्मशाळा) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी हभप संजय महाराज पाचपोर यांचे सुमधुर कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

व्हिडिओ लिंक – https://youtu.be/sDEwJZTZQyg

अभिष्टचिंतन कार्यक्रमानिमित्त हजारो वारकरी संप्रदायातील नागरिक उपस्थित होते. तसेच हभप निवृत्ती महाराज देशमुख यांनी महर्षी गुरुवर्य हभप मारुती बाबा कुरेकर (Maruti Baba Kurekar) यांचे पूजन केले.

Weather Update : सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता

ग्रामस्थांनी, वारकरी संप्रदायातील नागरिकांनी, मठाधिपती तसेच विविध ठिकाणांवरून आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी पुष्पगुच्छ, हार, प्रतिमा देत त्यांचा सत्कार केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.