Vadgaon Maval : शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा लावा;मावळ भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा लावाव्यात, अशी मागणी मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली. भाजपच्यावतीने नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांना निवेदन दिले.पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व शासकीय कार्यालयात राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, उपुख्यमंत्री यांचे फोटो लावले जातील, असे आश्वासन नायब तहसीलदार जयश्री मांडवे यांनी दिले.

त्याच सोबत वडगांव पोलिस स्टेशन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सोशल मिडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या व्यक्तींवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी पोलिस निरक्षक विलास भोसले यांच्याकडे करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर,उपसभापती शांताराम कदम, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे, वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे, कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे, सोशल मिडिया संयोजक सागर शिंदे, कामशेत शहर अध्यक्ष प्रवीण शिंदे, रामनाथ शेटे, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे, अरुण कुटे,कुसगाव बुद्रुकचे सरपंच माऊली गुंड,रवि आंद्रे,तानाजी आंद्रे, विठ्ठल तुर्डे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.