Maval : वळक गावात बुद्ध विहाराच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज -नाणे मावळातील वळक गावात (Maval)बुद्ध विहाराच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी(दि. 22) संपन्न झाले. एक हजार चौरस फूट जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुद्ध विहाराचे काम केले जाणार आहे.यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 20 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

या भूमिपूजन समारंभास सामाजिक कार्यकर्ते (Maval)सनी जाधव,उपसरपंच सुनिल बांगर,ग्रामपंचायत सदस्य सदाशिव बांगर,संदीप जाधव,अमोल थोरवे,मच्छिंद्र थोरवे,रोहिदास वाघमारे,सागर रणपिसे,प्रल्हाद जाधव,अर्जुन रणपिसे,राजेंद्र रणपिसे, बबन जाधव,गुलाब जाधव,आदि ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या.

 

Pimple Saudagar : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 20 लाखांची फसवणूक

आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून ग्रामविकास निधी 2023-24अंतर्गत वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे.स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आरसीसीचे बांधकाम होणार असून सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.