Maval : टाकवे बुद्रुक पुलावरून कार इंद्रायणी नदीत कोसळली, एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश; अद्याप दोन युवक बेपत्ता

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडल्याची घटना आज दुपारी 1.15 च्या सुमारास घडली आहे. एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप दोन युवक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. कारमध्ये तिघांपैकी दोघेजण अडकले असून एकजण पोहून बाहेर आल्याने बचावला आहे. संकेत नंदु असवले (ड्रायव्हर) आणि अक्षय मनोहर जगताप अशी कारमधील तर, अक्षय संजय ढगे असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळी बचावकार्यासाठी एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. तसेच पुलावर नागरिकांनी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवदुर्ग संस्थेच्या कार्यकर्त्यांचे शोधकार्य चालू आहे. 

  • याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, टाकवे जवळील इंद्रायणी पुलावरून स्विप्ट डीझायर कार पुलाचा कठडा तोडून कार इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडली. या कारमध्ये अक्षय संजय ढगे (वय २० वर्षे), संकेत नंदु असवले (ड्रायव्हर) (वय २० वर्षे) आणि अक्षय मनोहर जगताप (वय २० वर्षे, तिघेही राहणार रा. टाकवे बु., ता. मावळ जि. पुणे) हे होते. एनडीआरएफच्या जवानांना कार शोधण्यात यश आले आहे. मात्र, अद्याप दोन युवक बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे.

त्यातील अक्षय ढगे हा पोहून बाहेर आला. तर, इतर दोघेजण कारमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम चालू आहे. स्थानिक आणि शिवदुर्ग टीमचे काम चालू आहे. एनडीआरएफची टीम हजर असून शोधकार्य चालू आहे. मावळचे तहसीलदार आणि आम्ही तसेच कामशेतचे पोलीस निरीक्षक, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक पोलीस बंदोबस्तासह हजर आहोत.

सुरुवातीला लोकांची गर्दी झाली होती. तसेच दोन्ही बाजूनी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र, आता गर्दी कमी झाली असून दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत सुरु आहे. आद्यप शोधकार्य चालू असून आयएनएस शिवाजी येथील पाणबुड्याना पाचारण केले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सो खेड यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवलेला असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असे वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले आहे.

संकेत नंदु असवले (ड्रायव्हर) आणि अक्षय मनोहर जगताप

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.