Maval Corona News : नवीन 185 रूग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.25 )185 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 525 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1331 आहे.

शहरी भागात 169 रूग्ण तर ग्रामीण भागात 16 रूग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 146रूग्ण सापडले. तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 19 रूग्ण आज सापडले.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 04 रूग्ण आज सापडले. तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 30,857 झाली आहे. तर दिवसभरात 122 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात सोमाटणे येथे 04 रूग्ण सापडले. कामशेत येथे प्रत्येकी 03 रुग्ण सापडले. नायगाव येथे 02रुग्ण सापडले. इंदोरी, घोणशेत, कुसगाव बुद्रुक, बेबडओव्हळ, येळसे,नवलाख उंब्रे व कान्हे येथे प्रत्येकी 01 रुग्ण सापडला.असे एकूण 16 रुग्ण सापडले.

29,001 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 10,402 लोणावळा नगरपरिषद हद्दीत 5,002 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,514 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 16,918 रुग्ण तर ग्रामीण भागात 13,939 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93.99 टक्के आहे तर मृत्यू दर 1.70 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 838, लोणावळा नगरपरिषदमध्ये 109 वडगाव नगरपंचायतमध्ये 58 व ग्रामीण भागात 326 असे एकूण 1331 रुग्ण आहेत, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.