Maval Corona Update : दिवसभरात 78 नवे रुग्ण; 33 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि.26) 78 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. सक्रिय रुग्णांची संख्या 662 आहे.

आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 32 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 03 रुग्ण व वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 02 रुग्ण सापडले. सध्या रुग्णालयात 662 रुग्ण उपचार घेत आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 9332 झाली आहे. तर दिवसभरात 33 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शुक्रवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये शहरी भागात 37 रुग्ण सापडले. ग्रामीण भागात तळेगाव दाभाडे ग्रामीण 09, कामशेत 07, शिरगाव 05, वराळे 03, सोमाटणे 03, गहूंजे 03, शिलाटणे 02, सांगावडे 02, चांदखेड, परंदवडी, येलघोल, कोथुर्णे, नायगाव, साते व वारू प्रत्येकी 01 एकूण 41 रुग्ण सापडले.

8439 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 232 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2979, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1749 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 605 रुग्ण सापडले आहेत.

शहरी भागात 5324 रुग्ण तर ग्रामीण भागात 4008 रुग्ण आढळून आले आहेत. एकाही रुग्णांची परिस्थिती गंभीर नाही. रुग्ण बरे होण्याचा दर 90.43 टक्के आहे. मृत्यू दर 2.49 टक्के आहे अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.