Maval : उत्कर्षासाठी मुलींनी कष्टपूर्वक प्रयत्नांची कास धरावी – यादवेंद्र खळदे

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

एमपीसी न्यूज – समाजसुधारकांनी केलेला (Maval) अत्यंत प्रखर संघर्ष आणि दिलेल्या त्यागानंतर मुलींना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याची जाणीव ठेवून उत्कर्ष साधण्यासाठी मुलींनी अभ्यासात एकाग्रता आणि कष्टपूर्वक प्रयत्नांची कास धरली पाहिजे, असे प्रतिपादन मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे यांनी मंगळवारी (दि. 23) निगडे येथे केले. सर्वोत्कृष्ठ आदर्श स्वयंसेविकेचे पारितोषिक सिध्देश्वरी शिवेकर हिला खळदे यांच्या हस्ते यावेळी देण्यात आले.

तळेगाव दाभाडे येथील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील 50 मुलींनी मावळ तालुक्यातील निगडे गावी सात दिवसीय निवासी शिबिरात सहभाग घेतला. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत घेण्यात आलेल्या श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अमीन खान,सरपंच भिकाजी भागवत यांच्यासह संस्था सहसचिव प्रा.वसंत पवार, मुख्याध्यापक उत्तम मांडे उपस्थित होते.

Pune : सामुहिक सतारवादनाने उस्ताद हमीद खान यांना देण्यात आली सांगीतिक श्रद्धांजली

सरपंच भिकाजी भागवत आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगाने (Maval) शिबिरार्थी मुलींनी श्रमदान करून गावगाड्यातील जीवनाचा अनुभव घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ यांनी सांगितले, की गटचर्चा,पर्यावरण,व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्यावर आधारित तज्ज्ञांची व्याख्याने, बचतगटांचे कामकाज, स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमातील मुलींचा सहभाग उल्लेखनीय राहिला.

यादवेंद्र खळदे पुढे म्हणाले, की चूल आणि मूल यापलिकडील जगाचा शोध मुलींनी घेतला पाहिजे. स्वत: सक्षम होताहोता आपण समाजाचंही देणं लागतो, याचा विचार केला पाहिजे. शिबिरात मिळालेले हेच संस्कार उद्याच्या संसारातील आकांक्षा पूर्ण करण्यास उपयुक्त ठरतील.

प्रा.वसंत पवार यांनी शिबिराचे उद्दिष्ट चारित्र्यसंवर्धन असल्याचे सांगितले. आपापल्या जीवनातील संघर्षांवर मात करण्यासाठी मुलींनी किमान भारतीय थोर महिलांच्या चरित्रांचे अभ्यासपूर्वक वाचन, मनन आणि चिंतन करण्याचे आवाहन अमीन खान यांनी केले. सरपंच भिकाजी भागवत यांनी मुलींनी केलेल्या कामकाजाचे कौतुक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. माधुरी चंदनशिव यांनी शिबिराच्या मूल्यमापनावर आधारित अनुभवांचे कथन केले. प्रा.साबेरा शेख, प्रा. सौरभ चेचरे, अमित पवार यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. निकिता ठुले आणि सिध्देश्वरी शिवेकर यांनी शिबिरातील अनुभवांवर आधारित मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन.प्रा. सोमनाथ कसबे. यांनी केले. आभार प्रा.डॉ. माधुरी चंदनशिव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.