Maval Corona Update: मावळात सक्रिय रुग्णांची संख्या 21, ओळकाईवाडीत डाॅक्टरला कोरोनाची लागण

Maval Corona Update: Number of active patients in Maval 21, new patient found in Olkaiwadi मावळात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील ओळकाईवाडी (कुसगाव बुद्रुक) लोणावळा येथील 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले. ही 50 वर्षीय व्यक्ती डॉक्टर असल्याचे सांगण्यात येते. सध्या मावळ तालुक्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या 21 आहे.

लोणावळा ओळकाईवाडी येथील 50 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या शरिरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दि. 5 रोजी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांचा शुक्रवारी (दि 12) जून रोजी स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे मावळ तालुका आरोग्याधिकारी डॉ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले

दरम्यान, कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाग क्र 3 मधील पूर्वेला- न्यारा कॉर्नर बिल्डींग, पश्चिमेला- न्यारा निवारा बिल्डींग, उत्तरेला- शिवसेना कार्यालय, दक्षिणेला- श्री स्वामी समर्थ सोसायटी हा परिसर कंटेन्मेट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

तर, ओळकाईवाडी (कुसगाव बुद्रुक) परिसर बफर झोन म्हणून आहे असे मावळ- मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी आदेशात नमूद केले आहे.

मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण- 38 (शहरी- 09 व ग्रामीण-29) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 17 जणांनी कोरोनावर मात केली असून आता मावळ तालुक्यात 21 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

मावळात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच कडधे आणि माऊ येथील दोन कुटुंबांतील एकूण 12 जणांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

त्या पाठोपाठ आता तळेगावमध्ये चार तर आज ओळकाईवाडी येथे एक रुग्ण सापडल्याने सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे.

मावळात कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.