Pune Corona Update: कोरोनाच्या 123 रुग्णांना डिस्चार्ज, 9 जणांचा मृत्यू, 320 नवे रुग्ण

Pune Corona Update: 123 corona patients discharged, 9 die, 320 new patients कोरोनामुळे आतापर्यंत 448 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचे आता 9 हजार 656 रुग्ण झाले आहेत

एमपीसी न्यूज- कोरोनाचे 123 रुग्ण रविवारी ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला. तर, दिवसभरात 320 नवे रुग्ण आढळले. 203 क्रिटिकल रुग्ण असून, 45 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत 448 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाचे आता 9 हजार 656 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

अप्पर – बिबवेवाडी परिसरातील 76 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, पांडवनगरमधील 74 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 60 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बाणेरमधील 79 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तर कोथरूडमधील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 67 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडीतील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, मॉडेल कॉलनीमधील 36 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त लठ्ठपणा, उच्चरक्तदाब असे इतरही आजार होते. पुणे शहरात आता कोरोनाचे साडे नऊ हजारांच्या वर रुग्ण झाले आहेत. तर, 448 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.