Kasarwadi: राज्यातील जिम पुन्हा सुरु करा, जिम ओनर्स असोसिएशनची मागणी

Kasarwadi: Restart gym in the state, demanded by the Gym Owners Association मागील तीन महिन्यांपासून आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे जिम मालकांचे जागा भाडे व लाईट बिल माफ करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या राज्यातील जिम पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र जिम ओनर असोसिएशन केली आहे.

कासारवाडी येथे आज (दि.14) महाराष्ट्र जिम ओनर असोसिएशन यांची पार पडली. या बैठकीसाठी पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील सर्व जिम मालक उपस्थित होते.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या जिम आज तीन महिन्यानंतर सुद्धा बंद असल्यामुळे जिम मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील जिम पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच, मागील तीन महिन्यांपासून आर्थिक उत्पन्न नसल्यामुळे जिम मालकांचे जागा भाडे व लाईट बिल माफ करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी असोसिएशनचे अध्यक्ष सागर गोदमगावे, महेंन्द्र चव्हाण, अविनाश इंदलकर, क्रुष्णा भंडलकर, विक्रम धुमाळ, शरद कनसे, रोहित वाधेला, राजेश ईरले, प्रतिक जाधव तसेच पुणे व पिंपरी चिंचवड मधील जिम ओनर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.