Maval Online Bappa Result : ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत मावळातील पाच जणांना ‘शहा ज्वेलर्स’तर्फे चांदीचे नाणे

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा स्पर्धेत मावळ विभागातून पाच विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.या पाच विजेत्यांना तळेगाव दाभाडे येथील शहा ज्वेलर्सच्यावतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस देण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा स्पर्धेला मावळातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा तसेच ग्रामीण भागातील स्पर्धकांनी त्यांच्या बाप्पांचे फोटो स्पर्धेसाठी पाठविले होते. ते सर्व फोटो एमपीसी न्यूजने यापूर्वीच प्रसिद्ध केले आहेत.

या सर्व स्पर्धकांमधून सोडत पद्धतीने पाच भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1)  योगेश राजेंद्र थोरात, तळेगाव दाभाडे

2) विजय शिवराम एरंडे, वतननगर, तळेगाव दाभाडे 

3) प्रशांत अविनाश कडवे, संस्कृत बिल्डिंग, तळेगाव दाभाडे  

4) रवी दत्ता केदारी, ताजे, मळवली 

5) रचना संदीप वर्तक, लोणावळा 

या सर्व विजेत्यांना उद्या (शुक्रवारी) रात्री ई-मेल द्वारे पीडीएफ स्वरूपातील प्रमाणपत्र पाठविण्यात येईल. शहा ज्वेलर्सच्या तळेगाव दाभाडे येथील मारुती मंदिर चौकाजवळील सुवर्णदालनात शहा ज्वेलर्सचे मालक सागर शहा यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

शहा ज्वेलर्स

मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे

संपर्क क्रमांक – (02114) 231200/ 297700

मोबाईल नं. 8855014850

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.