Maval : लोकसभा मतदार संघातील 208 मतदान केंद्रांचे ‘वेबकास्टींग’

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे असून त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. ‘सीसीटीव्ही’ कॅमे-याच्या माध्यमातून या केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.

मतदारसंघात एकूण दोन हजार 504 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी 208 मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. पनवेलमध्ये सर्वाधिक 58 मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वांत कमी नऊ मतदारकेंद्र चिंचवड मधील आहेत. या कॅमे-याच्या माध्यमातून करण्यात येणारे चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयात दिसणार आहे. पनवेललमधील 58, कर्जत 35, उरण 29, चिंचवड 9 आणि पिंपरी 40 अशा एकूण 208 मतदारकेंद्राचे कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी केवळ नऊ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रशासनाची देखील लगबग सुरु आहे. तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.