Mhalunge : जमिनीच्या व्यवहारात दाम्पत्याची 31 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – मुकबधीर असलेल्या व्यक्ती आणि त्याच्या पत्नीची दोघांनी मिळून 31 लाख रुपयांची फसवणूक केली. जमीन विक्रीतून आलेले पैसे मुकबधीर असलेल्या (Mhalunge)जमीन मालकाच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर बँकेची कागदपत्रे ताब्यात घेऊन फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट 2018 ते 22 एप्रिल 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील भांबोली येथे घडला.

याप्रकरणी महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल माणिक राउत, माणिक राउत (दोघे रा. मेदनकरवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : ‘आयआयबी’चा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग’ पुरस्काराने गौरव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती मुकबधीर आहेत. त्यांच्या पतीच्या नावावर असलेली जमीन विकण्यासाठी फिर्यादी यांनी आरोपींना सांगितले. त्यानुसार आरोपींनी पिंपरी येथील एका व्यक्ती सोबत व्यवहार केला. त्या व्यक्तीने जमिनीचे पैसे चेकद्वारे दिले. (Mhalunge) तो चेक फिर्यादी यांच्या पतीच्या बँक खात्यात जमाही झाला. त्यानंतर आरोपींनी पतीच्या बँकेची महत्वाची कागदपत्रे स्वतःकडे घेतली. त्यानंतर बँक खात्यातून 31 लाख रुपये काढून घेत फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.