Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर बंदला समिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील महापुरुषांच्या (Pimpri Chinchwad) बदनामी विरोधात विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी आज पुकारलेला पिंपरी चिंचवड शहर बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा राज्यातील पहिला शहर बंद असून बहुजन महापुरुष सन्मान समितीच्या नेतृत्वाखाली हा बंद होत आहे.

समितीच्या प्रमुख मागण्या –

1) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ताबडतोब राज्यपाल पदावरून हकालपट्टी करण्यात यावी.
2) भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ताबडतोब देशातील जनतेची माफी मागावी.
3) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करून जनतेची माफी मागावी.

Pune News : शिवरायांच्या अपमानाच्या निषेधार्थ 13 डिसेंबरला पुणे बंद, मुस्लिम संघटनांचाही पाठिंबा

हा बंद सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन सकाळी 10 वाजता सुरु झाले आहे. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुपारी 12 वाजता पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ येणार आहेत.

पिंपरी, चिंचवड, सांगवी व इतर भागात बंदला समिश्र प्रतिसाद मिळत (Pimpri Chinchwad) आहे. येथे जवळ जवळ अर्धी दुकाने बंद आहेत. आकुर्डी पूर्णपणे बंद असून निगडी गावठाण, चिखली, राहटणी, थेरगाव सारख्या भागात बंदला उत्तम प्रतिसाद आहे. या ठिकाणी बहुतांश दुकाने बंद आहेत. या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी या सारखे राजकीय पक्ष सहभागी आहेत. तसेच 100 हून अधिक विविध पुरोगामी सामाजिक संघटना जसे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, छावा संघटना, मराठा क्रांती मोर्चा, प्रहार व इतर संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे. शहरातील औद्योगिक संघटना देखील बंदमध्ये सहभागी आहेत. तसेच, सर्व मुस्लिम संघटना या बंदमध्ये सहभागी आहेत.

बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळल्या –

दूध, भाजीपाला, शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसेस, रिक्षा, औषध दुकाने, घरगुती गॅस सिलेंडर वितरण, पेट्रोल पंप, इतर वगळण्यात आले आहेत.

शांततेत बंद पाळला जाणार – Pimpri Chinchwad

समितीचे समन्वयक मानव कांबळे म्हणाले, की सर्व सहभागी पुरोगामी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना शांततेत विरोध करतील. बंदमध्ये सामील होण्यासाठी कुणावरही जबरदस्ती करणार नाहीत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.