Kalewadi News : मनसे पदाधिकाऱ्यांच्या कारच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी अनिता पांचाळ यांच्या कारच्या काचा तिघांनी फोडल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 16) पहाटे काळेवाडी परिसरात घडला.

अनिता पांचाळ यांनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. तिघांनी मिळून कोयत्याने मारत त्यांच्या कारच्या काचा फोडून कारचे नुकसान केले. हा प्रकार राजकीय इर्षेयेतून केल्याचे म्हटले जात आहे. वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुणे दौरा सुरू आहे. अशातच पक्षाच्या पदाधिका-याच्या वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार समोर आल्याने मनसे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहेत.

पिंपरी येथे देखील पाच ते सहा वाहनांच्या काचा फोडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. चार जणांच्या टोळक्याने ही वाहने फोडली आहेत. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने तक्रार दाखल केली नसल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे इंस्पेक्शन सुरू आहे. यासाठी राज्याचे अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व विशेष पथके) संजय कुमार शहरात आहेत. राज्याचे अतिवरीष्ठ पोलीस अधिकारी शहरात असताना असे प्रकार घडत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.