Sangavi: शतपावली करणार्‍या एकाचा 25 हजारांचा मोबाईल हिसकावला

mobile phone snatching in sangavi चेतन रात्री जेवणानंतर सांगवीतील शंकर मंदिर परिसरात मोबाईलवर बोलत शतपावली करत होते.

एमपीसी न्यूज- जेवण करून मोबाईलवर बोलत शतपावली करणार्‍या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार जुनी सांगवीत गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.

चेतन प्रकाश टांक (वय 45, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन गुरूवारी रात्री जेवणानंतर सांगवीतील शंकर मंदिर परिसरात मोबाईलवर बोलत शतपावली करत होते.

दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपीपैकी एकाने त्यांच्या हातातील सॅमसंग गॅलक्सी नोट-9 हा 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. तसेच विनोद सिंग राठोड यांचाही सात हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.